औद्योगिक क्षेत्रावरही आंदोलनांचा परिणाम
By Admin | Updated: October 10, 2016 02:07 IST2016-10-10T02:07:04+5:302016-10-10T02:07:37+5:30
औद्योगिक क्षेत्रावरही आंदोलनांचा परिणाम

औद्योगिक क्षेत्रावरही आंदोलनांचा परिणाम
नाशिक : शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे औद्योगिक क्षेत्रावरही प्रतिकूल परिणाम झाला. सातपूर आणि अंबड येथील अनेक छोट्या कारखान्यांतील कामगारांना दुपारनंतर सुटी देण्यात आली.
शनिवारी तळेगाव प्रकरणामुळे शहराच्या काही भागात निर्माण झालेल्या तणावापाठोपाठ रविवारी नाशिक बंदची हाक देण्यात आल्याची चर्चा पसरली. त्याचा परिणाम बाजारपेठ आणि अन्य कामकाजावर झाला. सातपूर आणि अंबडमधील छोट्या उद्योगांमधील कामगारांच्या उपस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला.