शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिल : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 20:51 IST

रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देबेशिस्त वाहतूक, त्यात अडथळ्यांची भर

नाशिक : कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली असून, रस्त्यावरील स्वनचलीत सिग्नल बंद असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावर त्यामुळे लहानमोठे अपघात तसेच वादविवादाच्या घटना घडू लागल्या आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 23 मार्च पासून लॉक डाऊन व संचारबंदी जारी केल्याने अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव करण्यात आला होता, त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावरील वाहतूक थंडावून रस्ते सामसूम झाले होते, रस्त्यावर वाहनच नसल्याने शहर वाहतूक शाखेने स्वनचलीत सिग्नल यंत्रणाही बंद केली, एरवी वाहनांची गर्दी, हॉर्न च्या गोंगात्याने गजबजून जाणारे रस्ते जवळपास एक महिनाभर शांत झाले होते, तथापि लॉक डाऊन चा तिसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी शिथिल केली, त्याच बरोबर लहानमोठे उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची अनुमती दिली, परिणामी जनजीवन पूर्व पदावर येण्यास सुरुवात होऊन रस्त्यावर वाहने धावू लागली आहेत, मात्र प्रत्येकालाच घाई असल्यागत वाहने दामटवली जात असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची व वाहनांची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यातून लहान मोठे अपघात, वाहनचालकांची हमरीतुमरीच्या घटना घडू लागल्या आहेत, हा सारा प्रकार शहरातील प्रत्येक रस्त्यावर घडत असताना मात्र रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट वेगाने वाहन हाकत आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.बेशिस्त वाहतूक, त्यात अडथळ्यांची भरशहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले असताना त्यात पोलीस यंत्रणेने अनेक मार्गावर कोरोनाच्या निमित्ताने अडथळे उभे केले आहेत, काही रस्ते अंशतः खुली आहेत तर काही पूर्ण बंद आहेत, त्यामुळे देखील अन्य पर्यायी रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडून त्यातून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण घडत आहे. शहर जर सरकारच्या आदेशाने व्यवसाय व उद्योगासाठी खुले केले आहे तर रस्ते कोणाच्या आदेशाने बंद आहेत असा सवाल केला जात आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी