नाशकात बंद नव्हे निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:14 IST2021-03-14T04:14:58+5:302021-03-14T04:14:58+5:30

नाशिक शहरात शनिवारी (दि.१३) बाजारपेठेतील सर्व दुकाने टाळेबंद होती. कोणा राजकीय पक्षाने बंद पुकारला की काय असे चित्र या ...

Restrictions not closed in Nashik | नाशकात बंद नव्हे निर्बंध

नाशकात बंद नव्हे निर्बंध

नाशिक शहरात शनिवारी (दि.१३) बाजारपेठेतील सर्व दुकाने टाळेबंद होती. कोणा राजकीय पक्षाने बंद पुकारला की काय असे चित्र या बंदमुळे दिसत असले तरी हे बंद नसून निर्बंध आहेत कोरोनाचे! नाशिक शहरात कोराेनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर आठवड्यात शनिवार आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशसनाचे आदेश दिले असून त्यांची अंमलबजावणी शनिवारपासून (दि.१३) करण्यात आली आहे. ------------

१३पीएचएमआर ७६..........देऊळ बंद...कोरोना संसर्ग वाढु लागल्याने नाशिक शहरात शनिवार आणि रविवार गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रसिध्द मुक्तीधाम असे बंद ठेवण्यात आले आहे. (छायाचित्र प्रशांत खरोटे)

---------------

१३पीएचएमआर ८४......

बंद नको असेल तर मास्क वापरा....कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नाशिक शहरात शनिवारी दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून असा शुकशूकाट नको असेल तर मास्क सारख्या सुरक्षा साधनाचा वापर करा हे सांगणारे हे बोलके छायाचित्र. (छायाचित्र प्रशांत खरोटे)

--------

Web Title: Restrictions not closed in Nashik