शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

प्रतिबंधित क्षेत्र कागदावरच : जुन्या नाशकात नियमांचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 19:22 IST

बाहेरून येणाऱ्यांसाठी रस्ते बंद आणि जुने नाशिककरांना मात्र रान मोकळे असेच एकूण चित्र या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी कठोरपणे अंमलात आणण्याचे आदेश

ठळक मुद्देदुचाकींचा सर्रास वापर, डिस्टन्स, मास्कला हरताळ'प्रवेश बंदी'चा देखावारस्ते बंद करून नेमके काय साध्य होणार?

नाशिक : जुने नाशिक परिसरात बाहेरून येणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेड व बांबू बांधून बंद केले गेले; मात्र या प्रतिबंधित क्षेत्रात कुठल्याहीप्रकारे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सांगितलेल्या उपाययोजना व नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. येथील अंतर्गत रस्त्यांवर सर्रासपणे दुचाकींचा वापरासह मास्क, 'डिस्टन्स'च्या नियमांनाही नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे; त्यामुळे केवळ रस्ते बंद करून प्रशासनाकडून देखावा केला जात आहे का? असा संतप्त प्रश्न आता उपस्थित होत आहे.जुने नाशिकसह भद्रकाली परिसरात कोरोनाचे संक्रमण वेगाने होऊ लागल्याने प्रशासनाची झोप उडाली. या भागातील रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या भागाला भेट देत पाहणी केली. यावेळी या भागाला बाहेरून जोडणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. पोलिस व मनपा कर्मचाऱ्यांनी जुन्या नाशकात येणाऱ्या सर्व वाटा बंद तर केल्या; मात्र अंतर्गत भागात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांकडून ज्याप्रमाणे नियमांचे पालन होणे गरजेचे आहे, त्याकडे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष केले. बाहेरून येणाऱ्यांसाठी रस्ते बंद आणि जुने नाशिककरांना मात्र रान मोकळे असेच एकूण चित्र या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी कठोरपणे अंमलात आणण्याचे आदेश दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांकडून दिले गेले आहेत; मात्र याबाबतही फारसे समाधानकारक चित्र या भागात अद्याप दिसत नाही. लोकजागृतीमध्येही प्रशासनाला अयपश येत आहे. तसेच पोलिसांकडूनही नियमांची सक्ती केली जात नसल्याने जुने नाशिकमध्ये बाहेरून येणारे रस्ते बंद करून नेमके काय साध्य होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस