शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिघांच्या मृत्यूस जबाबदार चालकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:22 IST

बेदरकारपणे स्कोडा कार चालवून स्विफ्ट कारला धडक देत तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी शेख फैज फारूख (रा. आयेशानगर) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.के.आर. टंडन यांनी बुधवारी (दि़१९) दोन वर्षे सक्तमजुरी व २३ हजार १०० रुपये दंड तर दुसरा आरोपी फारूख हबीब शेख (रा. आयेशानगर, साहील गार्डन, नाशिक) यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़

नाशिक : बेदरकारपणे स्कोडा कार चालवून स्विफ्ट कारला धडक देत तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी शेख फैज फारूख (रा. आयेशानगर) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.के.आर. टंडन यांनी बुधवारी (दि़१९) दोन वर्षे सक्तमजुरी व २३ हजार १०० रुपये दंड तर दुसरा आरोपी फारूख हबीब शेख (रा. आयेशानगर, साहील गार्डन, नाशिक) यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़ मुंबई-आग्रा महामार्गावरील गडकरी चौकात हा अपघात घडला होता़सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे २६ मे २०१७ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास स्विप्ट कारने (एमएच १५, डीसी ०५२७) भामरे कुटुंबीय जात होते़ गडकरी चौकातून मुंबई नाका सिग्नलकडे वळण घेत असतानाच, त्र्यंबक नाका सिग्नलकडून भरधाव आलेल्या स्कोडा (एमएच ०१, एएल ७९३१) गाडीने भामरे यांच्या स्विप्ट कारला धडक दिली. या भीषण अपघातात स्विप्ट कारमधील योगिनी लीलाधर भामरे (१९), सरिता लीलाधर भामरे (३५, रा. मूळ- जळगाव) व रेखा प्रकाश पाटील (३३, रा. मुंबई) या तिघींचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश टंडन यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सहायक पोलीस निरीक्षक एऩ जे़ कंडारे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते़ यामध्ये सरकारी वकील चंद्रलेखा पगारे यांनी, आरोपींनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालविल्याचे साक्षीदार व पुराव्यासह सिद्ध केले़ त्यानुसार आरोपी शेख फैज फारूख यास सक्तमजुरी तर फारूख हबीब शेख यास तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघात