‘रंग रंगभूमीचे’ चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद
By Admin | Updated: November 10, 2014 00:42 IST2014-11-10T00:41:49+5:302014-11-10T00:42:34+5:30
‘रंग रंगभूमीचे’ चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद

‘रंग रंगभूमीचे’ चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद
नाशिक : गंगापूररोडवरील हार्मनी आर्ट गॅलरीमध्ये गेल्या बुधवारपासून सुरू असलेल्या ‘रंग रंगभूमीचे’ चित्रप्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. दरम्यान, प्रदर्शनात विविध नाटकांतील प्रसंगांचे सुमारे पन्नासहून अधिक छायाचित्रे लावण्यात आल्याने जणू काही ‘हार्मनी’ला रंगभूमीचे स्वरूप आले होते. दरम्यान, अरुण गिते, राजेश जाधव, राजेश भालेराव, विजय दीक्षित, शरद उगले, गायत्री देशमुख आदिंनी हजेरी लावली. प्रदर्शनाचे आयोजन राजा पाटेकर यांनी केले होते. चित्रप्रदर्शनामध्ये रंगकर्मी राजेश जाधव, हेमंत गव्हाणे, सदानंद जोशी यांच्या छायाचित्रांचा समावेश होता. (प्रतिनिधी)