तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 05:49 PM2018-12-29T17:49:56+5:302018-12-29T17:50:01+5:30

खर्डे : देवळा तालुकास्तरीय सतराव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एसकेडी इंटरनॅशनल स्कुल देवळा येथे पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर होत्या.

Response to Taluka-level science exhibition | तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

Next
ठळक मुद्देप्रदर्शनासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र विजेत्यांना देण्यात आले.

खर्डे : देवळा तालुकास्तरीय सतराव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एसकेडी इंटरनॅशनल स्कुल देवळा येथे पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर होत्या.
मालेगाव येथील आर. टी. ओ जाधव, संस्थेच्या सचिव मीना देवरे, संस्थेचे व्हाईस चेअरमन भूषण पगार, मेघराज शेवाळकर, मविप्र माजी संचालक डॉ भास्कर सावंत, शिक्षणविस्तार अधिकारी सतिश बच्छाव, नंदू देवरे, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विध्यार्थ्यांच्या जिज्ञासाना शास्त्रीय आधारदेत विज्ञान शिक्षकांनी त्यांच्या कुतुहलांना प्रोत्साहन दिल्यास ग्रामिण भागातील खऱ्या संशोधकांना पुढे आणण्याचे आदर्श कार्य शिक्षकांच्या हातुन घडेल असे गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
त्यानंतर विज्ञान प्रदर्शनात विज्ञान अध्यापक संघ यांच्या आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार प्राथमिक विभागातून जि. प. शाळा वासोळच्या शिक्षिका वृषाली देसले, माध्यमिक विभागातून पिंपळगाव हायस्कुलच्या वैशाली निकम, श्रीशिवाजी विद्यालय देवळा सुनील आहेर यांना पुरस्कार देण्यात आला. लोहोणेर शाळेच्या नाट्यचमूचे राज्यस्तरावरील निवडीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

विज्ञान प्रदर्शनातील निकाल :
१ ते ८ विध्यार्थी उपकरण-जि.प.विद्या निकेतन (प्रथम), सुशांत पगार व तेजस भामरे खुंटेवाडी (द्वितीय), सार्थक सूर्यवंशी के. बी. एच. विद्यालय खालप (तृतीय).
९ ते १२ विद्यार्थी उपकरण-हरीश बागुल व हितेश सूर्यवंशी लोहोणेर (प्रथम), उत्कर्ष निकम, एस. के. डी. इंटरनेशनल स्कूल (द्वितीय), घनश्याम कुवर विद्यानिकेतन देवळा (तृतीय).
शैक्षणिक साहित्य-प्राथमिक गट- काशिनाथ सोनवणे, जि. प. शाळा वाखारी (प्रथम )
शैक्षणिक साहित्य-माध्यमिक- एस.वाय सावंत. वाखारी विद्यालय (प्रथम)
सहायक परिचर- जनता विद्यालय लोहोणेर, विकास पाटील (प्रथम).
लोकसंख्या शिक्षण स्वच्छता व आरोग्य प्राथमिक गट-रोहिणी बागुल, जि. प. शाळा वाखारी.
लोकसंख्या शिक्षण स्वच्छता व आरोग्य माध्यमिक गट-अरु ण लाडे माध्य. आश्रम शाळा वाजगाव.सर्व प्रकल्प जिल्हास्तारावरील प्रदर्शनासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र विजेत्यांना देण्यात आले.
प्राचार्य सुनील पाटील, उपप्राचार्य नितीन वाघ यांनी प्रदर्शन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. विनीत पवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्र मास केंद्र प्रमुख दिलीप पाटील, रावबा मोरे, घनश्याम बैरागी, संजय ब्राम्हणकर, शिरीष पवार यासह तालुक्यातील विज्ञान शिक्षक, विज्ञान अध्यापक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन विज्ञान विभाग प्रमुख सुप्रिया आहिरे व सुधीर सोनवणे यांनी केले.
(फोटो २९ खर्डे १)
पारितोषिक वितरण करतांना गटशिक्षणाधिकारी सुनीता धनगर समवेत उपस्थित मान्यवर.

Web Title: Response to Taluka-level science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.