‘तुझ्यात मला शोधताना’ अभिवाचनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:08 IST2017-10-18T00:08:20+5:302017-10-18T00:08:27+5:30

ठेवा संस्कृतीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि गुलालवाडी व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गुलालवाडी व्यायामशाळा येथे अनोख्या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 Response to the 'search for you in me' speech | ‘तुझ्यात मला शोधताना’ अभिवाचनास प्रतिसाद

‘तुझ्यात मला शोधताना’ अभिवाचनास प्रतिसाद

नाशिक : ठेवा संस्कृतीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि गुलालवाडी व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गुलालवाडी व्यायामशाळा येथे अनोख्या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमांतर्गत हेमा जोशी, अनघा धोडपकर आणि पल्लवी पटवर्धन यांचा समावेश असलेल्या पती-पत्नीच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नात्यातील प्रत्येक पानवारचा संवाद असलेल्या ‘तुझ्यात मला शोधताना’ हे अभिवाचन सादर करण्यात आले. ठेवा संस्कृती यांच्यातर्फे आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी वर्षातील प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात आणि याचाच एक भाग असलेल्या उपक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत पणती पेटवून, रांगोळी काढून तसेच मातीचा किल्ला साकारत अनोखा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. विविध रंगी सौंदर्य आणि विविध पैलू उलगडणाºया वेशभूषा स्पर्धेचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गायत्री बेळगे, वैशाली साठे, सोहा लाळे, गीतांजली आव्हाड, मनाली गर्गे, वैशाली शुक्ल, वैशाली घोडके, भाग्यश्री शिवदेकर, त्रिवेणी सानप, सायली सप्रे आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब देशपांडे आणि सुहास अष्टपुत्रे यांची विशेष उपस्थिती लाभली.

Web Title:  Response to the 'search for you in me' speech