प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:15 PM2020-02-02T22:15:27+5:302020-02-03T00:27:31+5:30

नेमिनाथ जैन संचलित एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

Response to quiz competition | प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

चांदवड येथील प्रश्नमंजूषा व मुलाखत स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत सतीश मणियार, कापसे, व्ही. ए. वानखेडे, एच. एस. गौडा, डी. व्ही. लोहार आदी.

Next
ठळक मुद्देचांदवड : एस.एन.जे.बी. तंत्रनिकेतन

चांदवड : येथील नेमिनाथ जैन संचलित एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी नाशिक व परिसरातील पदविका महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास सतीश मणियार मॅनेजिंग डायरेक्टर आॅफ टेक्नोकॅड सोल्युशन नाशिक तसेच कापसे, (असिस्टंट प्रोफेसर व टीपीओ) एस.एन.जे.बी. अभियांत्रिकी चांदवड प्रामुख्याने उपस्थित होते. युगांत अर्जुन दाघुळे (गुरुकुल तंत्रनिकेतन, नांदगाव) यास प्रथम पारितोषिक मिळाले तसेच अमित कसौधन (लोकनेते गोपाळराव गुळवे तंत्रनिकेतन नाशिक) यास द्वितीय पारितोषिक मिळाले. रोहित विश्वास जाधव (एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतन, चांदवड) यास तिसऱ्या
क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: Response to quiz competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.