ओझर परिसरात लॉकडाउनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:10 IST2020-03-26T20:40:43+5:302020-03-26T23:10:20+5:30
आपल्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले असून, त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी ‘मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार’, असा निश्चय करून ओझर व टाउनशिपमधील नागरिकांनी लॉकडाउनला प्रतिसाद दिला आहे.

सायखेडा फाट्यावरील मारुती वेशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुकशुकाट.
ओझर टाउनशिप : आपल्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले असून, त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी ‘मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार’, असा निश्चय करून ओझर व टाउनशिपमधील नागरिकांनी लॉकडाउनला प्रतिसाद दिला आहे. किराणावगळता सर्व दुकाने बंद होते तर रस्त्यावर विनाकारण येणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवून आहेत.
बोटावर मोजण्याइतके नागरिक दिसून आले. ओझरमध्ये सायखेडा फाटा, साईधाम मंदिर रस्ता याठिकाणी भाजीपाला, तर ओझर टाउनशिपमध्ये भाजी मार्केट येथे भाजीपाला, किराणा घेण्यासाठी गर्दी केली असता पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या सहकाºयांनी नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवा सांगत घरातच थांबण्याचे आवाहन केले. पोलिसांनी सर्वत्र ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली तर गर्दी करणाºया व विनाकरण रस्त्यावर फिरणाºयांना पिटाळून लावले.