जागतिक जावा डे ला नाशिकमध्ये प्रतिसाद
By Admin | Updated: July 9, 2017 16:22 IST2017-07-09T16:22:00+5:302017-07-09T16:22:00+5:30
‘२ स्ट्रोकर’ आणि ‘एनवायजेसी’ ग्रुप

जागतिक जावा डे ला नाशिकमध्ये प्रतिसाद
नाशिक : जागतिक जावा डे च्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि. ९) कॉलेज रोड येथे जावा मोटार सायकलचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अत्यंत दुर्मिळ आणि लोक प्रिय ठरलेल्या जावा गाड्यांचे जतन व्हावे यासाठी यासाठी नाशिक शहरासह जगभरात ‘१५ वा जागतिक जावा डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेज रोड येथे शहरातील ‘२ स्ट्रोकर’ आणि ‘एनवायजेसी’ या ग्रुपतर्फे जावा कंपनीच्या शेकडो गाडया या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. या उपक्रमात नाशिकसह, पुणे, धुळे, बुलडाणा, सुरत, वापी, चंदिगढ, दिल्ली येथील जावा बाईक प्रेमींनी आपली वाहने याठिकाणी प्रदर्शित केली होती. जावा डे निमित्त आयोजित या प्रदर्शनात ‘जावा वायसन’ या झोकोस्लोव्हकीया देशात तयार करण्यात आलेल्या बाईकचे प्रमुख आकर्षण होते. ‘येझ दी ३५०’ ही टु स्ट्रोक आणि दोन सिलेंडर असलेल्या जावा बाईकचेही विशेष आकर्षण या प्रदर्शनात पहायला मिळाले. जागतिक जावा डेच्या पार्श्वभुमीवर गंगापूर रोड येथील सोमेश्वर लॉन्स येथे १९८४ साली मुंबई ते रोम असा तीन महिने जावा गाडीवर प्रवास करणारे प्रविणकुमार कारखानिस यांनी जगभरातल्या वेगवेगळया राईड, राइड करताना घेण्याची काळजी, गाडी चालवितांना घेण्याची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.