इन्ड्यूरन्स सायकल स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 16:41 IST2019-03-12T16:41:50+5:302019-03-12T16:41:56+5:30
नाशिक : नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनच्या एनआरएम या उपक्र माच्या तिसº्या पर्वातील तिसरी इन्ड्युरन्स स्प्रिंग राईड उत्साहात संपन्नझाली.

इन्ड्यूरन्स सायकल स्पर्धेला प्रतिसाद
नाशिक : नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनच्या एनआरएम या उपक्र माच्या तिसº्या पर्वातील तिसरी इन्ड्युरन्स स्प्रिंग राईड उत्साहात संपन्नझाली.
ही राईड ४० आणि ८०किमी अशा दोन प्रकारात घेण्यात आली. ४० किमी अंतर १ तास ५० मिनिटात कापून रणजित वधाने यांनी तर ८० किमी अंतर केवळ ३ तास आणि ०५ मिनिटात कापून अनिकेत झंवर यांनी बाजी मारली. एकूण ६० स्पर्धकांनी भाग घेतला.
या व्यतिरिक्त लहान मुलांसाठीसुद्धा शिवशक्ती सायकल्स ते गम्मत जम्मत अशी २० किमी ची राईड आयोजित केली गेली होती.
ही राईड यशस्वी करण्यासाठी परमजीत व दविंदर सिंह भेला, चंद्रकांत नाईक, मोहन देसाई, सुरेश डोंगरे तसेच स्नेहल देव यांनी परिश्रम घेतले. त्यांना शिशिर आचार्य, यश देसाई, आनंद चव्हाण, प्राची कर्हे, सोनाली सुर्वे आणि पल्लवी शेटे यांनी सहकार्य केले.
या पुढची एनआरएम ३.४ ही ४० आणि १२० किमीची राईड १४ एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे.(12सायकल स्प्रिंगराइड)