सावरकरांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

By Admin | Updated: February 26, 2017 23:24 IST2017-02-26T23:23:59+5:302017-02-26T23:24:19+5:30

भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने भगूर येथील सावरकर स्मारकात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी सावरकरप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.

Respect for Savarkar on Sriram Din | सावरकरांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

सावरकरांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने भगूर येथील सावरकर स्मारकात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी सावरकरप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. यावेळी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  सकाळी ७ वाजता पुरातन विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, सहायक रमेश कुलकर्णी, व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, सोमनाथ बोराडे यांच्या हस्ते स्मारकातील सावरकरांच्या जन्म खोलीत शासकीय पूजा करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचारक विजय पुराणिक, विलास चाटे, उपेंद्र कुलकर्णी यांनी देशभक्तिपर गीत गायले. चारूदत्त दीक्षित निर्मित बागेश्री वाद्यवृंदाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपाध्यक्ष मनीषा कस्तुरे, नगरसेवक कविता यादव, अश्विनी साळवे, रघुनाथ साळवे, संजय शिंदे, दिपक बलकवडे आदिंनी स्मारकात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी चंद्रकांत सहासने यांच्या कलापथकाने कीर्तन सादर केले.  रमेश पडवळ, रामनाथ रावळ यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सावरकर शिकत असलेल्या शाळेत तसेच स्वातंत्र्यदेवता ठेवलेल्या मंदिरात जाऊन गं्रथवाचन केले. आज दिवसभर सावरकरप्रेमींची सावरकर स्मारकात गर्दी झाली होती. यावेळी विविध संस्थांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल होते. (वार्ताहर)
 

Web Title: Respect for Savarkar on Sriram Din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.