लासलगावी सर्पमित्रांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:17+5:302021-08-15T04:17:17+5:30

समाजात सापांविषयी फार भीती आहे. परंतु साप हा शेतकर्‍यांचा मित्र असून, उंदीर व बेडकाला भक्ष्य बनवून शेतकऱ्यांना मदत करण्याचे ...

Respect to Lasalgaon serpent friends | लासलगावी सर्पमित्रांचा सत्कार

लासलगावी सर्पमित्रांचा सत्कार

समाजात सापांविषयी फार भीती आहे. परंतु साप हा शेतकर्‍यांचा मित्र असून, उंदीर व बेडकाला भक्ष्य बनवून शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करीत असतो; परंतु समाजात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. सर्प पकडून गावाबाहेर जंगलात सोडून देण्याचे काम सर्पमित्र करतात. आपला जीव धोक्यात घालून ते साप पकडण्याचे काम करीत आहे. अशा सर्पमित्रांचा सत्कार करून त्यांचा पुढील कार्यास निश्चितच प्रेरणा मिळेल, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी सर्पमित्र प्रमोद महानुभाव, नामदेव बरडे, आकाश इंगळे, प्राध्यापक श्रीराम कंधारे, आसीफ पटेल, राजू तांबोळी, कमलाकर देवडे, अजय काकड, अजय आहेर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मुख्य महासंघटक भूषण दरोळे, जिल्हा अध्यक्ष गोविंद दुधे, उपाध्यक्ष नवनाथ जिरे, निफाड तालुका अध्यक्ष विकास खुडे, उपाध्यक्ष राजेंद्र महाले, जनसंपर्क अधिकारी आसीफ पठाण, मुख्य सचिव अत्तरदे , महासचिव आनंद परदेशी,सचिव सचिन गायकवाड युसूफ खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.(१४ लासलगाव १)

140821\14nsk_2_14082021_13.jpg

१४ लासलगाव १

Web Title: Respect to Lasalgaon serpent friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.