एकात्मतेचा संदेश देणाºया सायकलस्वारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:18 IST2020-01-22T22:50:30+5:302020-01-23T00:18:31+5:30
पानिपतच्या लढाईतील धाराशाही पडलेल्या मराठा सैनिकांच्या स्मृती जागवून त्या वीरांना वंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नाशिकहून पानिपतकडे गेलेल्या तरुणांचे परतताना मालेगावी राष्टÑ सेवा दलातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

पानिपत ते नाशिक हा १५०० किमी प्रवास करून राष्टÑीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सायकलवीरांचे मालेगावी राष्ट्र सेवा दलातर्फे स्वागत करताना सुनील वडगे, विकास मंडळ, अश्विन माळी, विलास वडगे, सुधीर साळुंके, हिरामण मंडळ, निंबा मोरे, रविराज सोनार, डॉ. रमेश चोपडे, दीपक मंडळ आदी.
मालेगाव : पानिपतच्या लढाईतील धाराशाही पडलेल्या मराठा सैनिकांच्या स्मृती जागवून त्या वीरांना वंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नाशिकहून पानिपतकडे गेलेल्या तरुणांचे परतताना मालेगावी राष्टÑ सेवा दलातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
नाशिक येथून सायकलवर तरुण पानिपतला गेले होते. पानिपत ते नाशिक असा सायकलवर प्रवास करणाºया तरुणांच्या सोबत राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष विकास मंडळ यांचे आगमन आज येथे झाले. त्यांचे सेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, जिल्हा संघटक रविराज सोनार, सुधीर साळुंके, सुनील वडगे, संजय आहिरे, प्रवीण वाणी, कविता मंडळ, वंदना शिंदे, जिजाबाई जगताप, अश्विन माळी, निंबा मोरे, हिरामण मंडळ, बापू महाजन, शशिकांत खैरनार यांच्यासह मोठ्या संख्येने राष्टÑ सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी मालेगावी सायकलपटूंचे स्वागत केले. सायकलपटूंनी आलेले अनुभव कथन केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. १४ जानेवारीपासून सुरू झालेली ही सायकल स्वारी २२ जानेवारी रोजी १५०० किमी प्रवास करून मालेगाव येथे आली.