येवल्यात रक्तपेढी सुरू करण्याचा संकल्प
By Admin | Updated: July 3, 2017 00:25 IST2017-07-03T00:25:14+5:302017-07-03T00:25:32+5:30
येवला : डॉक्टर्स असोसिएशन आणि पॅनासिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.

येवल्यात रक्तपेढी सुरू करण्याचा संकल्प
येवला : येथील डॉक्टर्स असोसिएशन आणि पॅनासिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यात डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. डी. सदावर्ते होते. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ. राजेश पटेल, सेक्रेटरी डॉ. नीलम पटणी, कोषाध्यक्ष डॉ. प्रभाकर तुसे होते.डॉ. सदावर्ते यांनी वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेल्या कामाबाबत माहिती देऊन सेवाभाव जोपासण्याचा धर्म सर्व डॉक्टरांनी चालूच ठेवण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी भाषणात डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.डॉ. कविता दराडे यांनी आगामी दोन महिन्यात रक्तपेढीची संकल्पपूर्ती करण्याचे जाहीर केले. डॉ. राजेश पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँक चेअरमन नरेंद्र दराडे यांनी उपस्थित डॉक्टरांसह मान्यवरांचा सत्कार केला.