वाॅर्ड क्रमांक ११ मध्ये अभ्यासिका उभारण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST2021-02-24T04:16:16+5:302021-02-24T04:16:16+5:30

मंगळवारी (दि.२३) महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली व उपआयुक्त तुषार आहिरे यांच्या उपस्थितीत विशेष महासभा बोलवण्यात ...

Resolution to set up study hall in ward no | वाॅर्ड क्रमांक ११ मध्ये अभ्यासिका उभारण्याचा ठराव

वाॅर्ड क्रमांक ११ मध्ये अभ्यासिका उभारण्याचा ठराव

मंगळवारी (दि.२३) महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली व उपआयुक्त तुषार आहिरे यांच्या उपस्थितीत विशेष महासभा बोलवण्यात आली होती. विषय पत्रिकेवर दोनच विषय ठेवण्यात आले होते. संगमेश्वर येथे अभ्यासिका बांधण्याचा नियोजित प्रस्ताव रद्द करून वाॅर्ड क्रमांक ११ येथील मोकळ्या भूखंडावरील सर्वे क्रमांक १५/२ या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रकातील ५० लाख रुपये वर्ग करावेत या विषयावर चर्चा होऊन हा विषय मंजूर करण्यात आला. एलईडी लाईटचा पुरवठा नियोजित करण्यात आलेल्या कंपनीकडून न घेता वाॅर्डनिहाय नगरसेवकांनी ठेका द्यावा जेणेकरून नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागणार नाही. याची अंमलबजावणी मार्चमध्ये मंजूर होणाऱ्या अंदाजपत्रकीय सभेनंतर करण्यात यावी अशी सूचना नगरसेवकांनी मांडली. चर्चेत नगरसेवक अतिक कमाल ,सखाराम घोडके ,कल्पना वाघ, एजाज बेग आदींसह नगरसेवकांनी सहभाग घेतला.

Web Title: Resolution to set up study hall in ward no