मोसम नदीपात्रातील अवैध वाळू उपशाबाबत ग्रामसभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:53 IST2019-01-29T18:53:16+5:302019-01-29T18:53:50+5:30
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अवैध वाळु उपसा तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी ठराव मांडण्यात आला. यानंतर सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.अध्यक्षस्थानी सरपंच कमल ठाकरे होत्या.

मोसम नदीपात्रातील अवैध वाळू उपशाबाबत ग्रामसभेत ठराव
खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे, ग्रामसेवक हेमंत सावंत, प्रमोद ठाकरे, कृष्णा ठाकरे उपस्थित होते. मोसम नदीतून अवैध वाळू वाहतूक सुरू असून भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गावात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तसेच बैलगाडीतून अवैध्य वाळू वाहतूक होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्याने घटत चाललेले पर्जन्यमान व वाढत चाललेला दुष्काळ यामुळे शेती प्रश्न गंभीर झाला आहे. यातच हरणबारी धरणातून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनामुळे काहीअंशी पाणीप्रश्न सुटण्यास मदत होते. परंतु मोसम नदीतून होणाºया वाळु उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. उपसा बंद न झाल्यास येणा-या काळात गावकºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याकङे लक्ष वेधत खाकुर्डीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखी मागणी लावून धरली. खाकुर्डी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत अवैध वाळु उपसा तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी ठराव मांडण्यात आला. यानंतर सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ठरावाची प्रत वङनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर मातोळे यांना देण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच पवन ठाकरे, कृष्णा ठाकरे, प्रमोद ठाकरे, संदीप ठाकरे, विनोद ठाकरे, राजेंद्र ठाकरेआदि ग्रामस्थ उपस्थित होते.