शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संकल्प पूर्ण, ३४ वर्षांनी घालणार चप्पल; लालचंद टाटिया रामललाच्या दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:30 IST

१९९० च्या काळात राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय झालेल्या कारसेवकांमध्ये नाशिकमधील लालचंद टाटिया एक होते.

नाशिक : अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात अनेक जणांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मंदिराचे बांधकाम झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ घेणारे लाखो कारसेवक देशभरात सापडतील. नाशिकमधील लालचंद टाटिया या कारसेवकाने तर थेट बांधलेल्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतल्यावरच पादत्राणे घालेन, असा संकल्प केला आणि आता तब्बल ३४ वर्षांनंतर ते अयोध्येला जाऊन आपला संकल्प पूर्ण करणार आहेत.   

१९९० च्या काळात राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय झालेल्या कारसेवकांमध्ये नाशिकमधील लालचंद टाटिया एक होते. नाशिकहून टाटियांसह ११ जण अयोध्येला गेले होते. आंदोलनात सक्रिय तर होतोच; परंतु मंदिर होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निश्चय केला आणि त्याचे व्रतासारखे ३४ वर्षे पालन केले. आता मंदिर बांधलेले पाहून समाधान वाटते. कधी एकदा राममंदिरात जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतो, असे झाले आहे. दर्शन घेतल्यानंतरच अयोध्येत मी चप्पल घालणार आहे, असे ते म्हणाले.  

मंदिरासाठी लढणाऱ्या ४०० कारसेवकांनी बलिदान दिल्यानंतर आता काही झाले तरी मंदिराचे निर्माण करायचेच असा निश्चय केला. मंदिरासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा निर्णय करीत तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निश्चय केला. आजपर्यंत तो पाळतो आहे.    - लालचंद टाटिया

तत्कालीन प्रवासाला दिला उजाळानाशिकहून टाटियांसह अनेकजण अयोध्योकडे निघाले होते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ही दोन राज्ये पार करायची होती. वाटेत भगवा रंग दिसला तरी पोलिसांचा त्रास सहन करावा लागत होता, असे टाटियांनी सांगितले. आता मंदिर बांधलेले पाहून समाधान वाटते. मी सुमारे ६४ वर्षांचा आहे. कधी एकदा रामंदिरात जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतो, असे झाले आहे. दर्शन घेतल्यानंतरच अयोध्येत मी चप्पल घालणार आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNashikनाशिक