मतदान मतपत्रिकेवर घेण्याचा वडांगळी ग्रामसभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:40 IST2019-05-31T18:39:36+5:302019-05-31T18:40:00+5:30
सिन्नर : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र असे असतानाही भाजपच्या विजयाचा ग्रामीण भागात जल्लोष नाही. ईव्हीएम बद्दल अनेक उलट-सुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीवरच संशय निर्माण होऊ लागला आहे. हा संशय दूर करायचा असेल तर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनऐवजी पुन्हा मतपत्रिेकवर घ्यावी, असा ठराव ग्रामसभेत मांडला. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अशी मागणी जिल्ह्यात प्रथमच सामान्य मतदारांनी ग्रामसभेद्वारे केली आहे.

मतदान मतपत्रिकेवर घेण्याचा वडांगळी ग्रामसभेत ठराव
सरपंच सुवर्णा कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव मांडण्यात आला. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, उपसरपंच किशोर खुळे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब खुळे, शरद खुळे, विनायक खुळे, सुनीता सैद, संगीता आढांगळे, वंदना सूर्यवंशी, उत्तम खुळे, अमित भावसार आदी उपस्थित होते. नितीन खुळे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मात्र दुसऱ्या बाजूला ईव्हीएम बाबतच्या उलट-सुलट चर्चा थांबत नाही. ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करणेही महत्वाचे नाही. मात्र समाजात निवडणुकांबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा संशयी वातावरणामुळे लोकशाही नाजूक वळणावर पोहचून धोक्यात येऊ शकते. त्यासाठी निवडणुका या निकोप व नि:संशयी वातावरणात पार पाडणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाहीवरील सामान्य जनतेचा विश्वास दृढ करायचा असेल तर निवडणूका या मतिपत्रकेवर घेण्यात याव्यात, असा ठराव नितीन खुळे यांनी मांडला त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. यावेळी विकास संस्थेचे माजी अध्यक्ष सचिन खुळे, बाळासाहेब खुळे, योगेश घोटेकर, राजेंद्र अहिरे, प्रमोद आढांगळे, रामनाथ कांदळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.