हिवरे येथे झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

By Admin | Updated: August 12, 2014 02:04 IST2014-08-11T21:31:24+5:302014-08-12T02:04:03+5:30

हिवरे येथे झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

Resistance to tree plantation in trees and tree conservation | हिवरे येथे झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

हिवरे येथे झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प


 सिन्नर: तालुक्यातील हिवरे येथील अशोक बहुउद्देशीय विकास संस्था व सिन्नर येथील गोंदेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने झाडांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प करून तसा संदेश दिला. नाशिक - पुणे महामार्गावरील मोहदरी वनउद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वनउद्यानात विविध वनौषधी वनस्पती असून, त्यांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी स्नेहल गुंजाळ, कोमल कदम, तेजस्विनी पगार, वैष्णवी बोचरे, विद्या खुळे, प्रीती गजरमल आदि मुलींना या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी अशोक बहुउद्देशीय संस्थेचे डॉ. डी. व्ही. रूपवते, गोंदेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरेश गुंजाळ, सिद्धेश गुंजाळ, अनिकेत गुंजाळ, सिद्धेश रूपवते आदि उपस्थित होते.

Web Title: Resistance to tree plantation in trees and tree conservation