ठेकेदारी पद्धतीने भरतीला मेहतर समाजाचा विरोध

By Admin | Updated: May 27, 2014 01:36 IST2014-05-26T23:55:05+5:302014-05-27T01:36:52+5:30

नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्‍यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली.

Resistance to the recruitment scandal | ठेकेदारी पद्धतीने भरतीला मेहतर समाजाचा विरोध

ठेकेदारी पद्धतीने भरतीला मेहतर समाजाचा विरोध

नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्‍यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली.
मेहतर समाजाची बैठक नाशिक मेहतर समाज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल बेग यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्‍यांच्या भरतीसंबंधी चर्चा करण्यात आली. परंपरेनुसार वाल्मीकी, मेघवाळ समाज साफसफाईची कामे करत आला आहे. शहराच्या आरोग्याचीच जबाबदारी एकप्रकारे मेहतर समाज सांभाळत आला आहे. मात्र, सफाई कर्मचार्‍यांची भरती करताना महापालिका ठेकेदारी पद्धत अवलंबत असते. अशा प्रकारच्या भरती प्रक्रियेला मेहतर समाजाचा तीव्र विरोध राहील. प्रसंगी काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेग यांनी यावेळी दिला. बैठकीला हितेष बहारे, छबुजी सारवान, साई उमरवाल, नटवर पारचे, जयेश बहारे, सुनील गहलोत, अमित चव्हाण, अजय पवार, प्रवीण गोमचे, संजय भोजने, ईश्वर गहलोत, नरेश सुसग्रोहर, दिनेश पारचे आदि उपस्थित होते.

Web Title: Resistance to the recruitment scandal