औषधांच्या आॅनलाइन विक्र ीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:56 IST2018-09-27T17:55:49+5:302018-09-27T17:56:14+5:30
कळवण- औषधांची आॅनलाइन विक्र ी आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ कळवण तालुक्यातील औषध विक्र ेत्यांनी शुक्र वार दि.२८ सप्टेंबर रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दर्शविला आहे,

औषधांच्या आॅनलाइन विक्र ीला विरोध
कळवण- औषधांची आॅनलाइन विक्र ी आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ कळवण तालुक्यातील औषध विक्र ेत्यांनी शुक्र वार दि.२८ सप्टेंबर रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दर्शविला आहे, जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजार केमिस्ट दुकाने बंद ठेऊन सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविणार असल्याने नाशिक जिल्हा व कळवण तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार जे पी गावीत यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नाशिक डिस्ट्रीक केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य नितीन वालखडे, कळवण तालुकाध्यक्ष अनिल शिरोडे यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील शिष्टमंडळाने आमदार जे पी गावीत, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले ,याप्रश्नी आपण विधानसभेत आवाज उठवून औषध विक्र ेत्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही आमदार गावीत यांनी शिष्टमंडळाला दिली.
अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा खजिनदार नितीन वालखडे, तालुकाध्यक्ष
अनिल शिरोडे यांनी दिली. शिष्टमंडळात किशोर कोठावदे, प्रकाश आहीरराव, बाळासाहेब चव्हाण, राजेश बच्छाव, चंद्रकांत कोठावदे , किशोर महाले, स्मितेश कासार सहभागी झाले होते.