प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रास विरोध
By Admin | Updated: September 5, 2015 22:24 IST2015-09-05T22:24:04+5:302015-09-05T22:24:55+5:30
प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रास विरोध

प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रास विरोध
सिडको : येथील खुटवडनगर, कामटवाडे भागालगत नव्याने होऊ घातलेल्या मलनिस्सारण (एसटीपी) केंद्रास परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, याबाबत मनपा प्रशासनाने विचार न केल्यास यापुढील काळात सर्व नागरिक एकत्रित येऊन जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
सातपूर शिवारातील (सर्व्हे नं. ११० ते ११८ ) व कामटवाडा खुटवडनगर भागालगत नव्याने विकसित होत असलेल्या ठिकाणी मनपाच्या वतीने मलनिस्सारण केंद्र उभारण्याची तयारी केली आहे; परंतु या ठिकाणी होऊ घातलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या लगतच काही अंतरावर शाळा, शासकीय कार्यालये, मंगल कार्यालये, छोटे-मोठी दुकाने आहेत. भविष्यात या मलनिस्सारण केंद्रामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्र्माण होऊ शकतो. यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागणार आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, विषारी जिवाणू, अळ्या आदिंचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच मलनिस्सारण केंद्रात मशिनरींचा सततचा आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषणाने परिसरातील शांतता भंग होऊ शकते. तरी मनपा प्रशासनाने याबाबत फेरविचार करावा अन्यथा या पुढील काळात जनआंदोलन करण्याचा इशारा हरीश जोशी, विलास पाटील, अनिल आव्हाड, निवृत्ती कोकाटे, सुभाष दत्ता, नाना भोळे, श्रीराम गोरे, अशोक वाडिले, यशवंत पैडलीस्कर, सुरेंद्र पंडित यांसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.