शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आउटसोर्सिंगला विरोध; नोकरभरतीचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:52 IST

आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आउटसोर्सिंगने अथवा मानधनावर भरती करता येतात काय, असा सवाल उपस्थित करत महापालिकेच्या मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत सभागृहाने एकमुखाने आउटसोर्सिंगला विरोध दर्शवित थेट नोकरभरती करण्याचाच आग्रह सदस्यांनी धरला.

ठळक मुद्देमहासभेत एकमुखाने आउटसोर्सिंगला विरोधपदे आउटसोर्सिंगने भरता येत नाहीतप्रस्ताव दुरुस्तीसह पुन्हा ठेवण्याची सूचना

नाशिक : आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आउटसोर्सिंगने अथवा मानधनावर भरती करता येतात काय, असा सवाल उपस्थित करत महापालिकेच्या मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत सभागृहाने एकमुखाने आउटसोर्सिंगला विरोध दर्शवित थेट नोकरभरती करण्याचाच आग्रह सदस्यांनी धरला. यावेळी, वैद्यकीय विभागाने आउटसोर्सिंग आणि मानधनावर भरती करण्याचा ठेवलेला प्रस्ताव परत माघारी पाठवत दुरुस्तीसह पुन्हा पुढच्या महासभेवर प्रस्ताव ठेवण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला दिले.  महासभेत वैद्यकीय विभागासाठी आस्थापनेवर तांत्रिक स्वरूपाची वैद्यकीय अधिकारी ही ३२ पदे मानधनावर, तर विविध संवर्गांतील सुमारे २५० पदे आउटसोर्सिंग एजन्सीद्वारे नेमण्यासाठी पाच कोटी ५८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला आक्षेप घेताना गुरुमित बग्गा यांनी सांगितले, आस्थापना परिशिष्टावर मंजूर असलेली पदे आउटसोर्सिंगने भरता येत नाहीत. जी पदे मंजूर नाहीत ती सुद्धा प्रस्तावात नमूद करण्यात आलेली आहेत.  आउटसोर्सिंगने भरती केल्यास आरक्षित पदांना धोका पोहोचतो. हेडनर्स, नर्स पुरविणे हे आउटसोर्सिंगने कसे भरता येऊ शकते, असा प्रश्नही बग्गा यांनी उपस्थित केला. प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी जी पदे मंजूर नाहीत ती आउटसोर्सिंगने भरता येणार नसल्याचा खुलासा करताना इतर पदे मात्र आउटसोर्सिंगने भरता येत असल्याचे नमूद केले. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले, आतापर्यंत २२०० कर्मचारी निवृत्त झाले आहेत. परंतु, खर्च वाढला म्हणून भरती करायची नाही, हे अन्यायकारक आहे.  सदर प्रस्ताव दुरुस्तीसह पुन्हा ठेवण्याची सूचना त्यांनी केली. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी आउटसोर्सिंगला विरोध दर्शवित आस्थापनेवरील मंजूर पदे भरण्यासाठी आग्रह धरला.  राहुल दिवे यांनी आउटसोर्सिंगद्वारे भरतीप्रक्रियेत आरक्षणाला धक्का पोहोचणार असेल तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सतीश कुलकर्णी, कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, दिनकर आढाव, राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार, शशिकांत जाधव यांनीही आउटसोर्सिंगऐवजी मंजूर असलेली रिक्त पदे पदोन्नतीने व थेट सरळ सेवा पद्धतीने भरण्याची सूचना केली. सभागृहनेता दिनकर पाटील यांनी नोकरभरतीसाठी प्रशासनाचीच मानसिकता नसल्याचा आरोप केला. अखेर महापौर रंजना भानसी यांनी सदरचा प्रस्ताव परत पाठवून देत नव्याने रोष्टरप्रमाणे भरतीचा प्रस्ताव ठेवण्याचे आदेशित केले. प्रभारी आयुक्तांचे स्पष्टीकरणप्रभारी आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणारे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी सदस्यांच्या शंकांबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले, सदर आउटसोर्सिंगद्वारे होणाºया भरतीप्रक्रियेत कुठेही आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे. नियमानुसार, आस्थापना खर्च ३५ टक्क्यांहून अधिक होत असेल तर नोकरभरती करता येत नाही. परंतु, महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्यावर भर दिला, तर नोकरभरतीला मान्यता मिळू शकते, असा सल्लाही राधाकृष्णन यांनी दिला. महापालिकेत बेकायदेशीर काममहापालिकेत प्रशासनाकडून कशाप्रकारे बेकायदेशीर काम सुरू आहे, याचा पाढाच गुरुमित बग्गा यांनी वाचला. बग्गा यांनी सांगितले, शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ही पदे प्रभारी असून, त्यांचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा अधिक झालेला आहे. उपआयुक्ताची दोन पदे रिक्त आहेत. सहायक आयुक्तपदाची दोन पदे भरली परंतु, त्यांच्याकडे विभागीय अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. संगणक विभागातील पाचही पदे रिक्त आहेत. एकूणच महापालिकेतील २५ टक्के पदे रिक्त असल्याचे सांगत ती भरण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे बग्गा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक