त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष फडके यांचा राजीनामा
By Admin | Updated: December 12, 2015 22:45 IST2015-12-12T22:44:46+5:302015-12-12T22:45:35+5:30
त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष फडके यांचा राजीनामा

त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष फडके यांचा राजीनामा
त्र्यंबकेश्वर : येथील नगराध्यक्ष अनघा फडके यांनी राजीनामा रोटेशनप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका कक्षाचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. फडके यांनी आपल्या पदाचा कार्यभार १७ जून २०१५ रोजी स्वीकारला होता.
शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या सहकारी नगरसेवकांसह त्या राजीनामा देण्यासाठी गेल्या होत्या. रोटेशनप्रमाणे आता दुसऱ्या इच्छुकास नगराध्यक्षपदाची संधी मिळणार
आहे.
त्र्यंबक नगरपालिकेचे या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिली अडीच वर्षे ओबीसीसाठी आरक्षित होती, तर दुसऱ्या टप्प्यातील अडीच वर्षे सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने १७ जून २०१५ पासून पुढील अडीच वर्षांची कारकीर्द सुरू झाली आहे. (वार्ताहर)