निफाडच्या उपनगराध्यक्षांचा आवर्तन पद्धतीने राजीनामा
By Admin | Updated: September 17, 2016 00:08 IST2016-09-17T00:08:42+5:302016-09-17T00:08:53+5:30
निफाडच्या उपनगराध्यक्षांचा आवर्तन पद्धतीने राजीनामा

निफाडच्या उपनगराध्यक्षांचा आवर्तन पद्धतीने राजीनामा
निफाड : निफाडच्या उपनगराध्यक्ष सुनीता संजय कुंदे यांनी आपल्या पदाचा आवर्तन पद्धतीने राजीनामा दिला आहे.
निफाड नगरपंचयातीवर भाजपा- शिवसेना युतीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या पदाच्या टर्म ठरल्या आहेत. उपनगराध्यक्ष पद शिवसेनेकडे असून पक्षातील नगरसेवकांमध्ये ठरल्याप्रमाणे आवर्तन पद्धतीने हा राजीनामा दिला असल्याचे शिवसेना शहरप्रमुख संजय कुंदे यांनी सांगितले. दरम्यान शनिवारी (दि. १७) नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठक होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक जावेद शेख व आनंद बिवाल यांच्या नावाची चर्चा आहे. (वार्ताहर)
विंचूर : परिसरात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.