उरलेल्या मंडपाचा विक्रेत्यांना आसरा
By Admin | Updated: September 23, 2015 22:52 IST2015-09-23T22:51:59+5:302015-09-23T22:52:46+5:30
उरलेल्या मंडपाचा विक्रेत्यांना आसरा

उरलेल्या मंडपाचा विक्रेत्यांना आसरा
नाशिक : साधुग्राममध्ये जवळपास निम्म्यापेक्षा जास्त खालशे साहित्य घेऊन रवाना झाले आहेत. काही खालशांमध्ये मंडप, इतर सामान आवरासावर सुरू आहे; मात्र ५० ते ६० खालशे त्र्यंबकच्या शाहीस्नानानंतर जाणार आहेत. त्यामुळे उरलेल्या या खालशातील मंडपाचा साधू, विक्रेत्यांना आसरा झाला आहे.
साधुग्राम तिसऱ्या शाही पर्वणीनंतर रिकामे होण्यास सुरुवात झाली; मात्र याठिकाणी रस्त्यावर विविध वस्तू विकणारे किरकोळ विक्रेते उदरनिर्वाहासाठी थांबले आहेत. आखाडे, खालशे गेल्याने इतर ठिकाणच्या रस्त्यावर भाविकांची गर्दी होत नसल्याने वस्तंूची विक्री होत नसल्याने त्यांनी कपिला संगमाजवळ ठाण मांडले आहे. कपिला संगमाजवळ कायम गर्दीचा ओघ असल्याचे वस्तूची विक्री चांगली होत असल्याचे सदर विक्रेत्यांनी सांगितले. सध्या मोजक्याच खालशांचा मुक्काम काही दिवस वाढल्याने त्याठिकाणच्या मंडपात थांबलेल्या साधू व विक्रेत्यांचे वास्तव्य दिसून येत आहे. पर्वणी काळात साधुग्राममध्ये विविध ंिठकाणी अन्नछत्रे मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे किरकोळ विक्रेते अन्नछत्रात भोजनाचा लाभ घेत होते. तसेच रस्त्यावर विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी साधुग्राममधील महापालिकेने उभारलेल्या खालशाच्या स्नानगृहात संसार मांडला आहे. खालशातील साधू रवाना झाल्यानंतर स्नानगृह व शौचालयाची शाही सुविधा या विक्रेत्यांना उपलब्ध झाली आहे. खालशाच्या स्नानगृहात स्वयंपाक करून त्याठिकाणीही त्यांचे वास्तव्य दिसून येत आहे. पावसामुळे स्नानगृहाच्या पत्र्यांच्या शेडचा निवासासाठी या विक्रेत्यांनी वापर केला आहे. साधुग्राममध्ये थांबायचे तोपर्यंत पावसापासून बचावासाठी हा पर्याय निवडल्याचे साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.
साधुग्राममध्ये खालशामध्ये मुक्कामी थांबलेल्यांच्या समस्या वाढल्या आहेत. खालशामध्ये चाऱ्या काढण्यात आल्या नसल्याने पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे याठिकाणी साधूंच्या निवासासह भोजन तयार करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुक्कामी थांबलेल्या खालशातील सेवा, सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)