गोदावरी एक्स्प्रेसला उशीर झाल्याने प्रवासी संतप्त

By Admin | Updated: November 25, 2015 22:30 IST2015-11-25T22:29:42+5:302015-11-25T22:30:47+5:30

गोदावरी एक्स्प्रेसला उशीर झाल्याने प्रवासी संतप्त

Residents of the Godavari Express are late due to the delay | गोदावरी एक्स्प्रेसला उशीर झाल्याने प्रवासी संतप्त

गोदावरी एक्स्प्रेसला उशीर झाल्याने प्रवासी संतप्त

लासलगाव : मनमाड - कुर्ला गोदावरी एक्सप्रेसने दर पौर्णिमेला मुंबईकडे शीख बांधव परतत असतात. प्रत्येक पौर्णिमेला या शीख बांधवांच्या दादागिरीमुळे नेहमी जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सोसावा लागत आहे. बुधवारी या गाडीचे सर्व दरवाजे शीख बांधवांनी बंद करून ठेवल्याने लासलगाव येथील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल ४० मिनिटे मेन लाईनला गाडी उभी असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली.
टीसीच्या मध्यस्थीने गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरपौर्णिमेला येथील प्रवाशांना या दबंगगिरीला सामोरे जावे लागत असून, रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांवर करवाई करण्याची मागणी लासलगाव येथील चाकरमान्यांनी केली आहे.

Web Title: Residents of the Godavari Express are late due to the delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.