नाशिक : गंगापूररोड परिसरातील हार्मनी आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या प्रदर्शनात ‘रेशमाच्या रेघांनी’ चित्रप्रदर्शन रेशीम धाग्यांनी विनलेल्या १०१ भेटकार्डांसह रंगीबेरंगी मोती व सजावट साहित्य वापरून केलेल्या रांगोळ्या शोपीस किचेन्स व विविध कलाकुसरीच्या वस्तू रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. घरसंसार सांभाळून कलेचा छंद जोपासणाऱ्या आणि कलानिर्मितीतून वेगळी ओळख निर्माण करणाºया सुवर्णा परांजपे यांनी साकारलेल्या या रेशीम धाग्यापासून साकारलेल्याया कलाकृतींनी नाशिकरांची विशेष दाद मिळत आहे. कलेचा आनंद इतरांपर्यंत पोहोचविल्याने वृद्धिंगतच होत असल्याने अशाप्रकारे प्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिकासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या कलाकृती आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया सुवर्णा परांजपे यांनी व्यक्त केली आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
‘रेशमाच्या रेघांनी’ चित्रप्रदर्शनाला दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:48 IST