मनसेच्या इगतपुरी महिला तालुकाध्यक्षपदी राखेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:16 IST2020-01-16T21:56:38+5:302020-01-17T01:16:48+5:30
घोटी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी महिला तालुकाध्यक्षपदी पूनम पन्नालाल राखेचा यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक ...

मनसेच्या इगतपुरी महिला तालुकाध्यक्षपदी राखेचा
घोटी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी महिला तालुकाध्यक्षपदी पूनम पन्नालाल राखेचा यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. इगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला संघटनात घोटी येथील पूनम राखेचा यांचे मोठे योगदान आहे. त्यानुसार पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर महिला तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, रतनकुमार इचम, महिला जिल्हाध्यक्ष कामिनी शिंदे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या नियुक्तीचे इगतपुरी तालुक्यातून स्वागत करण्यात आले.