शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासारख्या महामारी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे- भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:24 IST

Bhagat Singh Koshyari : विद्यापीठाचे कुलपती  तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकृत मुख्य प्रशासकीय इमारतीचे  तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन  झाले.

नाशिक : कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित झालेे असून, या काळात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग यासारख्या विविध पॅथींनीही एकत्रित केलेले काम कौतुकास्पद असले तरी यासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. विद्यापीठाचे कुलपती  तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकृत मुख्य प्रशासकीय इमारतीचे  तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन  झाले. ते म्हणाले, डॉक्टर आणि नर्सचे आरोग्यसेवेचे व्रत अवघड आहे. त्यापेक्षा शिक्षण घेणे अवघड असून, अशी ज्ञान ग्रहणाची शक्ती लाभलेल्यांसाठी पायाभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व  असून, त्यासाठी नेतृत्वाची भूमिका पार पाडताना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.कोरोना से मत डरो, डटके सामना करोराज्यभरात परीक्षांना विरोध होत असताना मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आणि आग्रही भूमिका घेतली, ती खरंच कौतुकास्पद असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. त्यांनी कोरोनाची भीती न बाळगता आलेल्या परिस्थितीचा सामना केल्याने परीक्षा यशस्वी झाल्याचे  नमूद करतानाच कोरोनाच्या भीतीने घाबरून न जाता योग्य ती काळजी घेऊन सामना केल्यास कोरोनापेक्षा भयंकर महामारीवरही मात करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस