विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे निवेदन

By Admin | Updated: August 9, 2015 22:49 IST2015-08-09T22:49:07+5:302015-08-09T22:49:54+5:30

कृती समिती : तुकड्यांचा प्रस्ताव प्रलंबित

Request for unaided junior colleges | विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे निवेदन

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे निवेदन

नाशिक : विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रलंबित मागण्यांसंबंधीचे निवेदन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात
आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्यांसंदर्भात शासकीय यादी जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आणि दोन वेळेस संचालकांनी त्याबाबत आदेश देऊनही कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे. त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे सदस्य खंदारे, आव्हाड, लोणकर आदिंसह कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Request for unaided junior colleges