नगर हत्त्याकांड प्रकरणी रिपाइंतर्फे निवेदन
By Admin | Updated: October 31, 2014 22:21 IST2014-10-31T22:20:57+5:302014-10-31T22:21:34+5:30
नगर हत्त्याकांड प्रकरणी रिपाइंतर्फे निवेदन

नगर हत्त्याकांड प्रकरणी रिपाइंतर्फे निवेदन
मालेगाव : नगर जिल्हा हत्त्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मालेगाव शाखेतर्फे येथील अप्पर जिल्हाधिकारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्यात दलितांवर अत्याचार होत असतांना शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे व पोलीस प्रशासनाकडून केवळ चौकशी सुरू असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. याप्रकरणी अपराध्यांना पाठीशी न घालता त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. यावेळी भगवान आढाव, रविराज थोरात, नितीन बोराळे, राजू बोरसे, स्वप्नील अहिरे, प्रेमकुमार निकम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)