मटाणे येथील भुसंपादनबाधीत शेतकऱ्यांचे मोबदल्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 17:52 IST2019-05-27T17:52:02+5:302019-05-27T17:52:42+5:30
मेशी : चणकापूर उजव्या कालव्याच्या मटाणे शिवारातील ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही, त्यांनी दिंडोरी लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांची भेट घेऊन मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले.

मटाणे येथील शेतकºयांनी खासदार भारती पवार यांच्याकडे भुसंपादीत मोबदला मिळावा यासाठी भेट घेतली.
मेशी : चणकापूर उजव्या कालव्याच्या मटाणे शिवारातील ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही, त्यांनी दिंडोरी लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांची भेट घेऊन मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले.
चारी क्र मांक ३ साठी शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. यावेळी खासदार भारती पवार यांनी प्रयत्न करून मोबदला मिळवून देण्यासाठी लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राहूल केदारे, भाऊसाहेब आहेर, उत्तम आहेर, पिनु आहेर, दामू आहेर, विठोबा आहेर आदी शेतकरी उपस्थीत होते.