समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST2017-08-04T23:21:09+5:302017-08-05T00:21:30+5:30
उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावरील विविध समस्यांबाबत मनमाड शहर भाजपाच्या पदाधिकाºयांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन निवेदन दिले.

समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना निवेदन
मनमाड : उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावरील विविध समस्यांबाबत मनमाड शहर भाजपाच्या पदाधिकाºयांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन निवेदन दिले.मनमाड हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने रेसुब कर्मचाºयांच्या संख्येत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा चिटणीस नारायण पवार, शहर अध्यक्ष जय फुलवाणी, कांतीलाल लुणावत, अंकुश जोशी, एकनाथ बोडके, सचिन कांबळे, आनंद बोथरा आदी उपस्थित होते.