सहाव्या योजनेतील समस्यांबाबत निवेदन
By Admin | Updated: October 5, 2015 23:18 IST2015-10-05T23:17:34+5:302015-10-05T23:18:52+5:30
सहाव्या योजनेतील समस्यांबाबत निवेदन

सहाव्या योजनेतील समस्यांबाबत निवेदन
सिडको : सिडको परिसरातील सहाव्या योजनेचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात यावे, यासाठी अनेक दिवसांपासून वारंवार मागणी करण्यात येत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पँथर सोशल ग्रुपच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अजित बाबर यांना सहावी योजना वसाहतीच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
बाबर यांनी नुकतीच सिडको परिसरातील पँथर सोशल ग्रुपच्या कार्यालयास भेट देऊन सहावी योजना वसाहतीच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी सहावी योजना नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष स्वप्नील भालेराव, राजू सोनवणे यांनी बाबर यांचा सत्कार केला. ग्रुपचे मार्गदर्शक उदय वाकळे यांनी सूत्रसंचालन केले. सागर शिरसाठ यांनी आभार मानले. यावेळी सनी सावंत, सागर पाटील, इम्रान कुरेशी, बापू खडांगळे, गुलाब सानप, विवेक वाकळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)