वीज वितरणच्या अधिकार्यांना निवेदन
By Admin | Updated: June 2, 2014 01:17 IST2014-06-02T01:09:35+5:302014-06-02T01:17:51+5:30
चांदवड : शहर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना शहरातील विजप्रश्नी निवेदन दिले.

वीज वितरणच्या अधिकार्यांना निवेदन
चांदवड : शहर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना शहरातील विजप्रश्नी निवेदन दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खैरे, तालुका उपप्रमुख राजकुमार संकलेचा, शहराध्यक्ष जगन्नाथ राऊत, चंद्रकांत गवळी यांनी केले. चांदवड शहरातील वीज खांब व वायर या साधारणत: ५० ते ५५ वर्षांपूर्वीच्या असल्याने त्यांची कालमर्यादा संपलेली असून, गजबजलेल्या भागात मोठा घातपात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याकडे लक्ष द्यावे गावातील पथदीप, मीटर बॉक्स बरेचसे तुटलेले असून, शहरात सारख्या दाबाने वीजपुरवठा करावा या बाबीकडे लक्ष न दिल्यास जनआंदोलन उभारले जाईलअसे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर) निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खैरे, उपतालुकाप्रमुख राजकुमार संकलेचा, शहराध्यक्ष जगन्नाथ राऊत, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत गवळी, गुड्डू खैरनार, अॅड. विशाल व्यवहारे, उमेश दांड, गणेश लहरे, मुन्ना गांधी, दीपक कुमावत, दीपक शिरसाठ, प्रसाद प्रजापत, रत्नाकर धुमाळ, शरद बोºहाडे, राजू भापकर, गणेश खैरनार, बापू अहिरराव, गणुकाका सोनवणे आदिंसह शिवसैनिकांच्या सह्या आहेत.(वार्ताहर)