पेन्शन हक्क संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:13 IST2018-04-06T00:13:04+5:302018-04-06T00:13:04+5:30
औंदाणे : शिक्षकांना बी.एल.ओ. कामाचे मानधन मिळाले नसल्याने ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी बागलाण जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे.

पेन्शन हक्क संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
औंदाणे : बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ. कामाचे मानधन अद्याप मिळाले नसल्याने ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी बागलाण जुनी पेन्शन हक्क संघटनेने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील बी.एल.ओ. निवडणुकीचे तीन-चार वेळेस काम करूनही कोणत्याही प्रकारचे मानधन रोखीने अथवा बँकेत वर्ग करण्यात आलेले नाही ते त्वरित वर्ग करण्यात यावे. बरेच कर्मचारी हे बी.एल.ओ. अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांना निवडणूक आयोगाच्या विविध योजना व कार्यक्रम राबवावे लागतात. त्यांनाही कोणतेही मानधन देण्यात आलेले नाही. आगामी निवडणूक कामात महिला कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणीही यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे.