नाशिक शिक्षण मंडळाचे बावनकुळे यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 22:50 IST2016-05-17T22:39:56+5:302016-05-17T22:50:57+5:30
नाशिक शिक्षण मंडळाचे बावनकुळे यांना निवेदन

नाशिक शिक्षण मंडळाचे बावनकुळे यांना निवेदन
नाशिकरोड : एकलहरे विद्युत निर्मितीने व्ही. एन. नाईक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाकरिता बांधून दिलेल्या इमारतीचे भाडे माफ करावे, या मागणीचे निवेदन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.
एकलहरा येथे वीजनिर्मिती केंद्राची पाहणी करण्यास आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्ही. एन. नाईक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात औष्णिक विद्युत केंद्रात काम करणाऱ्या कामगारांची मुले-मुली शिक्षण घेत
आहेत. या शाळेच्या इमारतीस वीजनिर्मिती केंद्राकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारण्यात आले आहे. कामगारांचे पाल्य शाळेत शिक्षण घेत असल्याने शाळेचे भाडे १०० टक्के माफ करावे, तसेच शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्यास याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)