आदिवासी भागातील शिक्षकांबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: October 10, 2015 23:11 IST2015-10-10T23:10:05+5:302015-10-10T23:11:27+5:30

आदिवासी भागातील शिक्षकांबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

Request for education teachers in Tribal areas | आदिवासी भागातील शिक्षकांबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

आदिवासी भागातील शिक्षकांबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

इगतपुरी : तालुक्याच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या कामाचा इतर बोजा कमी करून त्यांना तालुक्यातील शिक्षण प्रणाली विकसित करण्याकरिता राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नवीन विविध योजना राबवुन विकास करावा याकरिता माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिष्टमंडळासह मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले.
इगतपुरी तालुक्यातील अती दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात पाहीजे तसा विकास न झाल्यामुळे येथील आदिवासी व इतर जमातीतील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहीलेले आहे. तालुक्याचा संपुर्ण दौरा करून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी प्रत्येक शाळेंना भेटी दिल्या त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की या भागात आदिवासी, ठाकर व इतर जमातीच्या नागरिकांचे अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे. म्हणुन शिक्षणानेच या भागाचा विकास साधला जावु शकतो.मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बांधकाम विभाग, मतदार याद्या सर्वेक्षण, निवडणुकीचे सर्वेची कामे, बिएलओची कामे या आदी कामांचा तनाव असल्याने या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ कमी पडत असल्याने शिक्षकांची इतर कामाचा बोजा काढुन घेण्यात यावा ही बाब शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनात आणुन देत या विषयीचे निवेदन दिले.शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी राज्यात नवीन धोरणांची आवश्यकता समजुन विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यात आले. त्याच प्रमाणे ई- लिर्नगचे धडे गिरविणाऱ्या शाळा विकसीत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि कौशल्यात भर पाडली. (वार्ताहर)

Web Title: Request for education teachers in Tribal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.