ब्राह्मण महासंघाचे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन

By Admin | Updated: August 6, 2014 02:02 IST2014-08-05T22:36:07+5:302014-08-06T02:02:09+5:30

ब्राह्मण महासंघाचे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन

Request for Brahmin Mahasangh Trimbak Tahsildar | ब्राह्मण महासंघाचे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन

ब्राह्मण महासंघाचे त्र्यंबक तहसीलदारांना निवेदन

 

नाशिक : ब्राह्मण समाजासमोर असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजातील मुलांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो आहे. नोकरी नसल्याने व पौरोहित्य करणाऱ्या युवकांना अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने त्यांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, जाहीर मेळाव्यातून, पुस्तकांमधून आणि नियतकालिकांमधून समाजाविषयी द्वेष पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी समाजाचा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात समावेश करावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन त्र्यंबकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना देण्यात आले.
याप्रसंगी जगदीश जोशी, प्रसाद भालेराव, सुशील कुलकर्णी, नरेश शर्मा, प्रमोद लांबे, वैभव सर्वज्ञ, मंगेश राजदेरकर आदि उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Request for Brahmin Mahasangh Trimbak Tahsildar