आयमाचे अपर पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन

By Admin | Updated: March 23, 2017 23:29 IST2017-03-23T23:28:56+5:302017-03-23T23:29:08+5:30

मालेगाव : सामूहिक रजेवर गेल्यानंतर डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेने बाह्यरुग्ण तपासणी सेवा बंद केली आहे.

Request for Additional Superintendent of AIMA | आयमाचे अपर पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन

आयमाचे अपर पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन

मालेगाव : धुळे येथे निवासी डॉक्टराला मारहाणीच्या व राज्यात निवासी वैद्यकीय अधिकारी सामूहिक रजेवर गेल्यानंतर डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेने बाह्यरुग्ण तपासणी सेवा बंद केली आहे. सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी अजय मोरे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निषेधाचे निवेदन सादर केले.
निवासी डॉक्टरला धुळे येथे मारहाण झाली होती. या मारहाणीचे पडसाद राज्यभर उमटले होते. राज्यातील निवासी वैद्यकीय अधिकारी सामूहिक रजेवर गेले होते. शासनाशी याबाबत संघटना चर्चा करीत असताना शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा बजावल्या आहेत. ज्युनिअर डॉक्टरांच्या समर्थनार्थ व त्यांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी शहरातील खाजगी डॉक्टरांनी आज गुरूवारपासून बेमुदत बाह्यरुग्ण तपासणी बंद केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा खाजगी रुग्णालयातुन पुरविली जाणार आहे. या आंदोलनात शहरातील दोनशे रुग्णालय सहभागी झाले आहेत. दिवसभर कामकाज ठप्प होते. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनचे मालेगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल भोकरे, सेक्रेटरी डॉ. सचिन ठाकरे, डॉ. महेश तेलरांधे, डॉ. तुषार झांबरे, डॉ. पुष्कर अहिरे, डॉ. पंकज मांगुळकर, डॉ. दिलीप भावसार आदिंसह इतर डॉक्टरांनी प्रांताधिकारी व अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निषेधाचे निवेदन सादर केले आहे.

Web Title: Request for Additional Superintendent of AIMA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.