मगवाना हत्त्येतील संशयिताचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: September 5, 2016 01:42 IST2016-09-05T01:42:00+5:302016-09-05T01:42:48+5:30
मगवाना हत्त्येतील संशयिताचा जामीन फेटाळला

मगवाना हत्त्येतील संशयिताचा जामीन फेटाळला
नाशिक : नाशिकरोड येथील रणजित मगवाना हत्त्येतील संशयित मयूर चमन बेद यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी शनिवारी (दि़३) फेटाळला़ या खून प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी बेद यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शनिवारी युक्तिवाद झाला़
आर्टिलरी सेंटर रोडवरील जैन भवनसमोर १७ फेब्रुवारी रोजी मागील भांडणाची कुरापत काढून फर्नांडीसवाडी येथील रणजित मगवाना या प्रॉपर्टी डिलरची संशयित रोहित ऊर्फ माले डिंगम, मयूर चमन बेद, संजय ऊर्फ मॉडेल चमन बेद व विनोद राजाराम साळवे यांनी डोक्यात गोळी घालून खून केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
रणजित मगवाना खून प्रकरणातील संशयित मयूर बेदच्या जामीन अर्जावर शनिवारी जिल्हा न्यायालयात सरकार पक्षातर्फे पी. व्ही. नाईक तर फिर्यादीच्या वतीने अॅड. अक्षय कलंत्री यांनी युक्तिवाद केला़