येवल्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:49 IST2021-01-28T21:45:07+5:302021-01-29T00:49:30+5:30

येवला : येथील नगरपरिषद कार्यालय आवारात आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Republic Day celebrations in Yeola | येवल्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

येवल्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

ठळक मुद्दे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली.

येवला : येथील नगरपरिषद कार्यालय आवारात आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली.

संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष बंडू शिरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचेसह नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते. तहसील कार्यालयात प्रभारी प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास तहसीलदार प्रमोद हिले, नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगळे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी, अ‍ॅड. माणिकराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे आदींसह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती येथे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: Republic Day celebrations in Yeola