सिन्नर शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:52+5:302021-02-05T05:46:52+5:30
तहसील कार्यालय मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसील कार्यालयात पार पडला. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार राहुल कोताडे ...

सिन्नर शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
तहसील कार्यालय
मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसील कार्यालयात पार पडला. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, नरेंद्र वाघ, नितीन गर्जे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दशथ चौधरी, उपनगराध्यक्ष बाळाासाहेब उगले, मुख्याधिकारी संजय केदार यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी व विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
नगरपरिषद
शहरातील नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते, तर हुतात्मा स्मारकात उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, तर ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक डॉ. वर्षा लहाहे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, गटनेते हेमंत वाजे, नामदेव लोंढे, नगरसेवक प्रमोद चोथवे, सोमनाथ पावसे, शैलेश नाईक, पंकज मोरे, श्रीकांत जाधव, संतोष शिंदे, सुहास गोजरे, मल्लू पाबळे, रामभाऊ लोणारे, रूपेश मुठे, मंगला शिंदे, प्रतिभा नरोटे, विजय जाधव, नलिनी गाडे, ज्योती वामने, सुजाता तेलंग, निरुपमा शिंदे, गीता वरंदळ, विजय बर्डे, चित्रा लोंढे, वासंती देशमुख, शीतल कानडी, मालती भोळे, अलका बोडके आदींसह नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या अधीक्षक डॉ. निर्मला पवार यांचा कोरोनायोध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
सिन्नर महाविद्यालय
येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. विनोद घोलप, डॉ. प्रशांत गाडे, आयटीआयचे प्राचार्य भामरे सर, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, शकुंतला गायकवाड, क्रीडा संचालक प्रा. एल. एस. कांदळकर, एनसीसी अधिकारी डॉ. उपेंद्र पठाडे, प्रा. एम. पी. खैरणार आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात सर्वांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक आंतर आदी नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रजासत्ताक दिवस कार्यक्रमाप्रसंगी कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रशांत गाडे, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. विनोद घोलप, एम. आर. जाधव, दत्तात्रय जोशी, अॅड. शिवानी बोराडे, सुरेश शिंदे, प्रा. रामदास सोनवणे, संगीता जाधव, प्रकाश बन गैया, ऋतुजा घोलप, आदित्य बोडके, ऋतुजा फस्तुळे, गीता लोखंडे, किरण काळे, कार्तिक पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांचा परेड निरीक्षण व संचालन कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन प्रा. योगेश भारस्कर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार पी. एम. खैरनार यांनी मानले. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाजे विद्यालय
मविप्र संचालित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय या ज्ञानसंकुलामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्रचे संचालक हेमंत वाजे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे आरोहण करण्यात आले. तर स्काऊट गाईडच्या ध्वजारोहण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. कहांडळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शालेय समिती सदस्य भाऊसाहेब गोजरे, डॉ. विजय लोहारकर, प्रसाद हंडोरे, कल्पना कानडी, अर्जुन गोजरे, पंढरीनाथ शेळके, मनीष गुजराती, घनश्याम देशमुख, चंद्रभान दातीर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डुबेरे
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे होते. राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड ध्वजाचे ध्वजारोहण विद्यालयाचे प्राचार्य सोपान येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्स पालन करून मान्यवरांसह सर्वांनी मास्क परिधान केले होते. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
वडांगळी
मविप्र संचिलत अभिनव बालविकास मंदिर व न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय वडांगळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या हस्ते तर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे यांच्या हस्ते झाले. अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाण, वडांगळी ग्रामपंचायतीचे प्रशासक रविकांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम कोरोना पार्श्वभूमीवर शासनाव्या निर्देशानुसार समारंभ साजरा करण्यात आला.
फोटो ओळी-
सिन्नर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करताना आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदार राहुल कोताडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वाघ, संजय केदार, रामभाऊ लोणारे, शीतल कानडी, सुजाता तेलंग यांच्यासह नगरसेवक.
फोटो ओळी-
सिन्नर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. निर्मला पवार-गायकवाड यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करताना गटनेते हेमंत वाजे. समवेत नगराध्यक्ष किरण डगळे, बाळासाहेब उगले, संजय केदार आदी.