पिण्याचे पाणी व विद्युतच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आक्रमक

By Admin | Updated: May 28, 2014 01:39 IST2014-05-27T23:58:21+5:302014-05-28T01:39:58+5:30

पंचवटी प्रभाग सभा : ५३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी

Representative aggressive on the question of drinking water and electricity | पिण्याचे पाणी व विद्युतच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आक्रमक

पिण्याचे पाणी व विद्युतच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आक्रमक

पंचवटी प्रभाग सभा : ५३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी

पंचवटी : संपुर्ण विभागात पिण्याच्या पाण्याचा तसेच बंद पथदीपांचा प्रश्न भेडसावत असला तरी संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही असा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठा व विद्युत विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पंचवटी प्रभागाची सभा सभापती शालिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत ५३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या प्रारंभीच सदस्यांचे सर्व विषय विनाचर्चा मंजूर करण्यात आले. त्यानंतर बंद पथदीपांच्या तक्रारी मांडण्यात आल्या.पंचवटीतील शेकडो पथदीप बंद असुन तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते असा आरोप करून लोकप्रतिनिधींनी उपस्थित विद्युतच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. पथदीप बंद असल्याची तक्रार केल्यास मटेरिअल नाही अशी उत्तरे देतात असे रंजना भानसी यांनी सांगितले. अधिकार्‍यांनी एलइडी फिटींग झाल्यानंतर ते दीड महिन्यांनतर सुरू होणार असल्याचे सांगितले. मखमलाबाद, रामवाडी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याची तक्रार दामोदर मानकर, मनिषा हेकरे यांनी केली. पाणी पुरवठा अधिकारी लिकेज आहे असे सांगून वेळ मारून देतात तर मखमलाबाद गावातील ८० टक्के नागरी वसाहतीत पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. पंचवटीचे पाणी पंचवटीला द्यावे असे सांगून अन्यत्र जलकुंभ झाल्यानंतर त्या भागात पाणी देणार नाही असे यापुर्वी अधिकार्‍यांनी सांगितले होते मात्र तसे झाले नाही अशी तक्रार उद्धव निमसे यांनी केली. प्रभागातील सार्वजनिक तसेच सुलभ शौचालयाची दुरवस्था झाल्याची तक्रार गुरमित बग्गा यांनी केली. उद्यानांची देखभाल नसल्याने देखभालीसाठी कर्मचारी देण्याची मागणी प्रा. कविता कर्डक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केली. पंचवटीत मोकाट श्वान वाढल्याची तक्रार प्रा. परशराम वाघेरे यांनी केली. बैठकीत डॉ. विशाल घोलप, गणेश चव्हाण, फुलावती बोडके, सिंधू खोडे, ज्योति गांगुर्डे, मिना माळोदे, लता टिळे, रुपाली गावंड, विमल पाटील आदिंसह मनपाचे सी.बी अहेर, बी. पी. खोडे, आर. एम. शिंदे आदिंसह अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
इन्फो बॉक्स
तिनशे पथदीप बंद
प्रभाग क्रमांक ३ मधील सुमारे तिनशे पथदीप बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरीकांच्य रोषाला बळी पडावे लागत आहे. एलइडी येतील तेंव्हा येतील मात्र तुर्तास प्रभागातील बंद पथदीप सुरू करावे.
रुचि कुंभारकर, नगरसेवक मनसे,

Web Title: Representative aggressive on the question of drinking water and electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.