निफाड कारखान्यावर आज जप्तीची कारवाई
By Admin | Updated: February 3, 2016 23:34 IST2016-02-03T23:34:05+5:302016-02-03T23:34:40+5:30
निफाड कारखान्यावर आज जप्तीची कारवाई

निफाड कारखान्यावर आज जप्तीची कारवाई
नाशिक : मूळ १३५ कोटींचे असलेले कर्ज पावणेदोनशे कोटींच्या कर्जवसुलीपोटी उद्या (दि. ४) जिल्हा सहकारी बॅँकेच्या वतीने निफाड सहकारी साखर कारखान्यावर १३३ कोटींच्या थकबाकीसाठी जप्तीची कारवाई करणार आहे.
प्रांत शशिकांत मंगरूळे यांच्या उपस्थितीत निफाड सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी संघटना, व्यवस्थापन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कार्यकारी संचालक सुभाष देसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गुरुवारी (दि. ४) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने निफाड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या जप्तीच्या कारवाईदरम्यान कायदा व्यवस्थेबाबत कोणतीही अनुचित घटना घडू नये, कामगारांचे वेतन झाले पाहिजे हे जरी खरे असले तरी थकबाकीच्या कारणाने ही जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांत मंगरूळे यांनी बैठकीत सांगितले. बॅँकेच्या १५ जणांच्या पथकामार्फत ही जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे २०० एकरहून अधिक जागेवर जिल्हा बॅँकेच्या मालकीचे फलक लावण्यात येणार आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याने मूळ १३५ कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचे व्याजासह पावणे दोनशे कोटींच्या घरात थकबाकी गेली. वर्षभरापूर्वी निसाकाची २ लाख ४६ हजार साखरेची पोती विकून ५४ कोटींची वसुली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने यापूर्वीच केली आहे. विशेष म्हणजे नाशिक सहकारी साखर कारखान्याकडील शंभर कोटींच्या थकबाकी पोटीही जिल्हा बॅँकेने नासाकावर जप्तीची कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)