निलंबनासाठी अहवाल आवश्यक : दीक्षित

By Admin | Updated: November 16, 2015 00:43 IST2015-11-16T00:43:13+5:302015-11-16T00:43:52+5:30

सादरे आत्महत्त्या : नगरसेवकासह वाळू व्यावसायिकांना समन्स

Report for suspension required: Dikshit | निलंबनासाठी अहवाल आवश्यक : दीक्षित

निलंबनासाठी अहवाल आवश्यक : दीक्षित

 नाशिक : जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सीआयडी चौकशीत व्यत्यय निर्माण केल्यास त्यांच्या निलंबनाचा विचार केला जाईल, मात्र त्यासाठी सीआयडीचा अहवाल आवश्यक असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते़
पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्त्येच्या तपासाच्या प्रगतीबाबत माहिती देताना दीक्षित म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून, ती स्वतंत्र व सक्षम यंत्रणा आहे़ यावर पत्रकारांनी संशयित पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते हे जळगावमध्येच कार्यरत असल्याने सीआयडी तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता सीआयडी अधिकाऱ्यांवर दबाव नसून तसे असल्यास ते त्यांचा अहवाल मला पाठवतील़ त्यांनी अशा स्वरूपाचा अहवाल पाठविल्यास या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले़ त्यामुळे या अधिकाऱ्यांची पोलीस महासंचालक पाठराखण करीत असल्याची शंका उपस्थित केली जाते आहे़
पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आॅक्टोबरमध्ये आत्महत्त्या केली़ तत्पूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सुपेकर, रायते, चौधरी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आहे़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे़ यावेळी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन, पोलीस उपायुक्त विजय पाटील, पकंज डहाणे, अविनाश बारगळ आदिंसह अधिकारी उपस्थित होते़

Web Title: Report for suspension required: Dikshit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.