रेशन, रॉकेल वेळेवर मिळत नसल्याची तक्रार
By Admin | Updated: July 7, 2014 00:10 IST2014-07-06T22:10:48+5:302014-07-07T00:10:23+5:30
रेशन, रॉकेल वेळेवर मिळत नसल्याची तक्रार

रेशन, रॉकेल वेळेवर मिळत नसल्याची तक्रार
सिन्नर : येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानांना स्वस्त
धान्य व रॉकेलचा वेळेवर पुरवठा
होत नसल्याची तक्रार कामगार
सेनेचे बंटी पाटील यांनी केले
आहे.
येथील भैरवनाथ सोसायटी भागातील स्वस्त धान्य दुकानात वेळेवर स्वस्त धान्य येत नसल्याने नागरिकांना ते वेळेवर मिळत
नाही. महिना अखेरीज होणारा
पुरवठा करण्याची तारीख व
दुकान सुरू राहण्याच्या वेळ
निश्चित करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्याची माहिती मिळत नाही.
दुकानातून वेळेवर धान्य
मिळत नसल्याने पाटील यांनी
नाराजी व्यक्त केली असून,
याबाबतचे निवेदन त्यांनी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)